जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो

Started by अशोक भांगे (सापनाई कर ), April 20, 2013, 06:56:28 PM

Previous topic - Next topic

अशोक भांगे (सापनाई कर )

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो चंद्र आठवतो .
उगाच चांदण्यांच्या गराड्यात एकटा भासतो ,
एकटा  असूनही प्रकाश मात्र देतच राहतो .

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो समुद्र आठवतो ,
खारट असूनही किती जीव सांभाळतो ,
लोक म्हणतात भरती आली ,
पण का कुणास ठाऊक मला मात्र तो किनाऱ्याला भेटल्याचा भास होतो .

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो अथांग वाटेवरचा वाटसरू दिसतो ,
लोक म्हणतात तो दूर जातोय ,
पण मला मात्र तो इच्छित ध्येयाच्या जवळ भासतो.

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
भूतकाळात कुठेतरी मी हरवून जातो ,
तू म्हणतेस मी मुमताज नाही तुझी ,
पण का कुणास ठाऊक,
मी मात्र शहाजानच  असल्याचा भास होतो ....

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो .........


                                            अशोक भांगे (सापनाई कर )

केदार मेहेंदळे


अशोक भांगे (सापनाई कर )



मिलिंद कुंभारे

तू म्हणतेस मी मुमताज नाही तुझी ,
पण का कुणास ठाऊक,
मी मात्र शहाजानच  असल्याचा भास होतो ....

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो .........

छान !!! :) :) :)

अशोक भांगे (सापनाई कर )





rudra