अशी सांज येते.

Started by yogeshingale, May 01, 2013, 12:20:18 PM

Previous topic - Next topic

yogeshingale

अशी सांज येते,
तशी ती जाते.
जाता जाता लवलवत्या पापण्यांनी
माझ्या हृदयाची  कंपने वाढवते .

अशी सांज येते,
भास्करा क्षितिजा पार घेऊन जाते.
तो जाता जाता ती त्याच्या किरणात न्हाऊन निघते .

तिच्या पाठमोऱ्या सावलीकडे मी पाहतो,
तिने पुन्हा फिरून माघे यावे ,
मला बिलगावे अशी आस धरून बसतो.

अशी सांज येते ,
वेळ पुन्हा कातर ,कातर  होते.
तिचे हि पाऊल पावलात घुटमळते .
मागे वळून तिची नजर मला शोधत राहते .

मी दिसता तशी ती धावत येते ,
नाजराला नजर भिडते.
आमच्या श्वासाची घालमेल ,
त्या सांजेला ला कळते .

अशी सांज येते ,
ती माझ्या मिठीत असते ,
शब्दांना जागा नसते ,
मात्र  अश्रूंना वाट मिळते .

ओघळता  तिचे अश्रू ,
ती सांज हि रडते ,
म्हणून कदाचित ती पावसाला हाक मारते .

तो गडगडून येतो ,
सार  काही भिजून टाकतो .
मी मात्र तिच्या डोळ्यातल्या काळ्या ढगाकडे बघता ओलाचिंब होतो.

--- योगेश इंगळे

मिलिंद कुंभारे



rudra




SWEETSUNITA

KHUP KAHI SANGTAT TUMCHE SHABD...V.TOUCHY.

           mukya bhawananna shabdachi saath!!!!!!!!!!!!!!!!!!!!

           PREMsagarala bhartichi laat.....

             nawin kawyachi aamhi pahaaaaaaaaaaaatoy waat.
                                                                                                     congrets.
       
         

Shrikant R. Deshmane

khupch chan yogeshji... :)
best luck 4 future..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

yogeshingale


Maddy_487