गुलाबी पाकळ्या

Started by मिलिंद कुंभारे, May 09, 2013, 11:31:53 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

गुलाबी पाकळ्या

नाजूक गुलाबी पाकळ्यामधून,
हलकेच ओघळताना, मधाचा,
एक थेंब दिसला!
क्षणभर मज कळेना,
आधी मध प्राशन करू,
कि पाकळ्याशी खेळू!
क्षण ओझरला, ऋतू बदलला,
पाकळ्या साऱ्या कोमेजल्या!
स्तब्ध मी, मज काही सुचेना,
आर्त स्वर एक, मनी कुजबुजला,
क्षणात मज आठवला,
मी चाखलेला, तो थेंब मधाचा!
नयनी दाटला, ऋतू एक ओघळला,
अन पाकळ्या साऱ्या फुलल्या!
क्षणभर मज कळेना,
कसे थांबवू, त्या बदलत्या ऋतूंना,
कसे साठवू, साचवू त्या थेंबांना,
मनमंदिरातल्या तळ्यांत माझ्या!

मिलिंद कुंभारे

Ankush S. Navghare, Palghar




मिलिंद कुंभारे

प्रशांत, कौस्तुभ, Prajunkush.......

मनापासून आभार!
आणखी एक विनोदी कविता लिहिलिय..."कोमेजलेल्या पाकळ्या"!
जरूर वाचा, विनोदी कवितांमध्ये!!!! :) :) :)

sweetsunita66

क्षणभर मज कळेना,
कसे थांबवू, त्या बदलत्या ऋतूंना,
कसे साठवू, साचवू त्या थेंबांना,
मनमंदिरातल्या तळ्यांत माझ्या :) :) :)मस्त !फारच छान  :)

Pratej10



मिलिंद कुंभारे

sweetsunita,
धन्यवाद
खूप मनापासून लिहिली होती हि कविता ....   :(
पण का कुणास ठाऊक जास्त प्रतिसादच मिळत नव्हता म्हणून दुसरी कविता लिहिली "कोमेजलेल्या पाकळ्या", जरूर वाचा ...  :D

मिलिंद कुंभारे


vijaya kelkar, Pratej.....धन्यवाद... :)

"कविता कशी लिहावी" हा general discussion मधला टोपीक जरूर वाचा आणि लयबद्ध कविता लिहायचा प्रयत्न करा ...

thanks... :)