कधी नाही तो वणवा आज भर पावसात भडकला.....

Started by Shona1109, May 29, 2013, 02:18:26 PM

Previous topic - Next topic

Shona1109

पहिल्या पावसाची पहिली सर काल रात्रीच  बरसून गेली
तुझ्या माझ्यातल्या प्रेमाला पुन्हा बहरून गेली

गुंग होतो प्रणयात तू न मी
घट्ट मिठीत तुझ्या घ्यायची  होती  मजला  ऊब

ओल्या मानेवर जाणवत होती तुझ्या श्वासांची तळमळ
चिंब पाठीवर केसांची नुसतीच सळसळ

मिटलेल्या ओठांच्या कळीला हलकेच तू फुलवलेला
थरथरत्या ओठांचा  रस पिण्यास होतास  तू आसुसलेला

अंगावरचे थेंब ओठांनी वेचताना हरपली तुझी भान 
खूप दिवसांची तृषा भागली याची  होती मला जाण

गरम श्वासांची होत होती देवाण घेवाण
भिजलेल्या अंगावर शहाऱ्यांची पसरली  गुलाबी शाल 

अंगभर भिनत होतो एकमेकांत
उरली नव्हती  कोणतीच वहिवाट 

तुझ्या माझ्या मिलनाला अंत आता नव्हता राहिला
कारण  कधी नाही तो वणवा आज भर पावसात भडकला ....shona








मिलिंद कुंभारे



rudra