पाऊस , तू अन मी

Started by SANJAY M NIKUMBH, June 09, 2013, 06:03:38 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

पाऊस , तू अन मी
--------------------------------
आवडतं मला पावसात
तुझ्यासंगे भिजायला
छत्री घरीच ठेवून
मनसोक्त हिंडायला
कधी पावसाकडे
कधी तुझ्याकडे बघायलां
मिठीत कधी तुला
कधी घेतो गारव्याला

आवडतं मला पावसात
तुझ्यासंगे भिजायला
चौपाटीवरचं एकच कणीस
अधून-मधून खायला
ओठांवर चिकटलेले
ते कणीस पुसायला
मी पुसतांना तुझं
लाजणं बघायला

आवडतं मला पावसात
तुझ्यासंगे भिजायला
तुझ्या डोळ्यात डोकावून
माझं प्रेम पहायला
आसुसलेल्या ओठांवरचे
पाणी अलगद टिपायला
झोकून तू देता
घट्ट मिठीत घ्यायला .

                              संजय एम निकुंभ , वसई
                             दि .  ९ . ६ . १३ वेळ : ८ स.
                               

Ankush S. Navghare, Palghar


jktogalwar

ओठांवर चिकटलेले
ते कणीस पुसायला
मी पुसतांना तुझं
लाजणं बघायला
apratim.....

rudra


मिलिंद कुंभारे


Ganesh Wadkar