पाऊस कोसळू लागल्यावर

Started by SANJAY M NIKUMBH, June 10, 2013, 11:14:21 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

पाऊस कोसळू लागल्यावर
---------------------------------------
पाऊस कोसळू लागल्यावर
तुझे सारे रंग , ढंग बदलून जातात
तुझ्या चेहऱ्यावरचे निरागस भाव
नकळत नशिले होऊन जातात

तुझ्या त्या नजरेत एक मादक अदा
कोठून येऊन जाते
माझ्या मनासही तिच्या नकळत
भूल देऊन जाते

तू घेऊन जातेस मला
कोसळणाऱ्या पावसात मनसोक्त भिजायला
हातात हात धरून
वाट मिळेल तेथे मनासारखं जगायला

बघ हे अख्खं हिरवं माळरान
कवेत घ्यायचंय मला
माझं देह भान हरपून
तुझ्यात विरघळून जायचंय मला

क्षणभर तर काय चाललंय
हेच मला उमजत नाही
तू तीच आहेस कां
मनात आल्यावाचून रहात नाही

ती म्हणते तू म्हणतोस ना प्रेमात
बेधुंद जगायचं म्हणून
जां विसरून तू या जगाला
होऊन जा माझा देह भान हरपून

मी हि झोकून देतो स्वतःला
तिच्या प्रीत झुल्याच्या झुल्यावर
पाऊस होऊन बरसत रहातो
माझ्या हृदयातल्या प्रेमावर


                                         संजय एम निकुंभ , वसई
                                      दि. १०. ६ . १३  वेळ : १० . ३० रा.



Ankush S. Navghare, Palghar

Sanjay ji.. Masta ekadam ghar basalya anandane bhijalyasarakha zalay...