आठवण सखीची...

Started by Ankush S. Navghare, Palghar, June 26, 2013, 01:55:08 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

घन दाटुनी आले
त्यात आठवण सखीची
जरी सोबत नाही आता
वाट तीच्याच येण्याची
लक्ष नाही कशातच
कामातही मन नाही
जरी उघडावे पुस्तक
डोळ्यांत तीच भरून राही
सतत जीव जळतोय
मन हि उदास होई
जरी बाहेर सर्व काही शांत
आत हृदय धडधडत राही
भेट तर रोजच होते
जेव्हा हृदयी आठवण येते
पण शरीराही आता ओढ आहे
तिच्या उबदार मिठीची
मनीच्या ह्या भावना
पोहोचतील का तिच्यापाशी
द्यावी तिनेही साद लगेच
हीच आस हृदयांतरी...
हीच आस हृदयांतरी...

... प्राजुन्कुश
... Prajunkush.


Ankush S. Navghare, Palghar


rudra


Ankush S. Navghare, Palghar


sweetsunita66


Ankush S. Navghare, Palghar


Madhura Kulkarni

#7
साद दे पुन्हा तू,
ती येईल धावत,
आनंद नि सुख
भरुनी कवेत...

दुरावा हा सारा
जाईल विरून,
क्षण आनंदाचे
येतील फिरून..

मधुरा कुलकर्णी.

Ankush S. Navghare, Palghar

Madhuraji... Dhanyavad...Khup sundar lihiley tumhi...

मिलिंद कुंभारे