मिलन

Started by प्रशांत नागरगोजे, June 26, 2013, 10:31:37 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

कल्पनाही नसेल तुला
वेड लावतो किती
नाजूक स्पर्श तुझा

कस्तुरी श्वासांत तुझ्या
एक होण्यास किती
तरसतो श्वास माझा

मखमली ओठांवरील तुझ्या
अबोल शब्दांना झेलण्यास
आतुर किती ओठ माझा

परिस मिठीत तुझ्या
तुझा होण्यास किती
अधीर  जीव माझा

                    -आशापुत्र
www.prashu-mypoems.blogspot.com

rudra


sweetsunita66

छान कविता  :) :)

प्रशांत नागरगोजे

thanks Rudra and Sunita :)