लेक असावी वाटते

Started by Çhèx Thakare, June 28, 2013, 12:21:24 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

जीव लावायला एक तरी
लेक असावी वाटते.....
लेक पाहिजे होती खरी
पण मनातून मुलगाच हवा होता
बाल जन्मल्यावर पेढे वाटतानाचा
आनंद काही औरच होता...
जरी मुलगा मुलगी समान तरी
दोघांना वेगळेच सांभाळावे लागते
लोकांच्या नजरेच्या तड्यापासून
तिला वाचवावे लागते...
लहानपण अगदी लाडीगोडीत
येऊन जात असते
पण शिक्षणाच्या बाजारात
मुलालाच शिकवावे वाटते...
मुलगी शेवटी परक्याचे धन
हेच का खरे वाटते
मुलगा आपल्याजवळच राहील का
ह्याला उत्तर नसते..
जावयाशी पण
खूप जपून वागावे लागते
जरी सून तोडून बोलली तरी
समजून घ्यावे लागते..
जीव लावायला एक तरी
लेक असावी वाटते
पण मनाजोगते आयुष्य
तिला जगायला मिळेल
का याची शंका वाटते !

Author Unknown

rudra

जावयाशी पण
खूप जपून वागावे लागते
जरी सून तोडून बोलली तरी
समजून घ्यावे लागते..

agdi kharay...

Çhèx Thakare

आपण सुद्धा त्याला काही करू शकत नाही :(

मिलिंद कुंभारे

जीव लावायला एक तरी
लेक असावी वाटते.....

छान.... :)

vijaya kelkar

    खरच आहे अगदी.
माझे विचार-----   जावे जावे माहेरा
                      आई राही तिच्या सासरा
                       लेकी पाहू डोळेभरा
                        वाट वाट पाहे...

Çhèx Thakare


sweetsunita66

लेक असो वा पुत्र वधु
फरक दोघींमध्ये नका हो साधू
लेक तर लेकच असते पण
पुत्रवधु असते मायेच देन 
जर द्याल तिला ममता अन सौरक्षण
ती पण करेल जीवापाड तुमचे रक्षण ,
असली लेक तर सोन्याहून पिवळे .
नसली तर पुत्रवधुलाच सांभाळा जिवापार, गडे ...  :) :)

Çhèx Thakare


sweetsunita66


Çhèx Thakare