निशब्द

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 15, 2013, 09:32:13 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

        "निशब्द"
.
.
मनाचा अधिरपणा आज... तरल त्या डोळ्यांना कळला...
अबोल भावनांचा थेँब आज...
सईच्या गालावरुन ओघळला...
ओंजळीत तिची आसवं झेलताना...
अलगद तो थेंब मनात भिनला...
.
.
पापण्यांची होणारी झापड...
आता मात्र बंद होती...
झुळझुळ वाहणाय्रा वाय्राची...
गतीही आता मंद होती...
.
.
ओंजळीत थेंब झेलण्याची...
माझी ही नवी रित होती...
आसवांसोबत भिजलेली...
गंधित ती प्रित होती...
.
.
वेचुन ते थेंब सारे...
केले मी तयांस शब्दबध्द...
हरवुनी आता तिझिया प्रितीत...
मी मात्र राहीलो निशब्द...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

केदार मेहेंदळे


vijaya kelkar

..................................

स्तब्ध आणि नि:शब्द
व्हावे कर-बध्द

Shona1109


कवि - विजय सुर्यवंशी.

केदारजी, विजयाजी आणी शोना प्रतिक्रियेकरता आभारी आहे...

Pratej10

Nishabd............. nishabd
Khoop chan :)

कवि - विजय सुर्यवंशी.

धन्यवाद प्रतेज.

मिलिंद कुंभारे

कवि - विजय सुर्यवंशी....

छान .... :)

कवि - विजय सुर्यवंशी.

आभारी आहे मिलिंद

sweetsunita66

कविता "निशब्द "पण सांगतात बरेच काही शब्द ,,,,छान आहे कविता  :)