शुभेच्छा सईच्या

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 19, 2013, 09:55:18 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

. . . शुभेच्छा सईच्या . . .
.
.
आज माझ्या वाढदिनी...
शुभेच्छा साय्रां मित्रांनी दिल्या...
वाट पाहण्यात रमुन गेलो मी तुझी...
पण सई तुझ्या शुभेच्छा न आल्या...
.
.
नेहमीच खिशात असणारा मोबाईल...
आज मात्र हातात होता...
का कुणास ठाऊक...
वेध त्याला कुणाच्या ओढीचा होता...
.
.
ओढुनिया मुखवटा स्मित हास्याचा...
मित्रांच्या सोबती हसत होतो...
कसं सांगु तुला सई...
आतुन किती मी जळत होतो...
.
.
कॉलेजच्या कट्ट्यावर बसुनिया...
कटाक्ष ते झेलत होतो...
अन दिसणाय्रा प्रत्येकीत...
तुलाच मी न्याहाळत होतो...
.
.
केक कापण्याच्या वेळी...
आसवांची दाटी तेँव्हा झाली होती...
तुझी अनं माझी कोरलेली नावं...
जेँव्हा मी केकवर पाहिली होती...
.
.
आयुष्याच्या बोलपटावर कधी न आलो एकत्र...
पण आज मात्र केकवर सोबती आलो होतो...
मांडुनिया अंतरपाठ हृदयाचा...
वचनबध्द तेँव्हा जाहलो होतो...
.
.
माझ्या भावनेची आर्तता...
आता वाय्राल्याही कळली होती...
व्याकुळतेने जळणारी ती
मेणबत्ती...
तेँव्हा त्यानेच विझवली होती...
.
.
तुझ्या नावाचा तो केकचा तुकडा...
मित्रांनी मज भरविला होता...
सोबतीच्या त्या मग गुलाबाने...
आनंद सारा द्विगुणीत जाहला होता...
.
.
येणाय्रा प्रत्येक वाढदिनाला...
सई मी  तुझीच वाट पाहिन...
अनं श्वासांच्या अखेरीच्या लयीपर्यँत...
सई मी फक्त तुझाच राहिन...
.
.

कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

Çhèx Thakare

कविराज

अगदी माझा प्रसंग ऊतरवलाय तूम्ही ह
जून्या अठवणी ताज्या केल्यात

आता दोन दिवस झोप येनार नाही बघा  :'(   :'(

कवि - विजय सुर्यवंशी.

आभारी आहे CHEX... माझ्या बाबतीत पण हेच झालं म्हणुन लिहली कविता. ;( ;(

मिलिंद कुंभारे

अनं श्वासांच्या अखेरीच्या लयीपर्यँत...
सई मी फक्त तुझाच राहिन...
.
.
क्या बात..... :)

कवि - विजय सुर्यवंशी.

प्रतिक्रियेकरता आभारी आहे मिलींद...

Çhèx Thakare

तूमच्या भावना खोलवर पोहचल्यात ह  ; चला मिच एकटा नाहीये बघून बरे वाटले 

कवि - विजय सुर्यवंशी.

शब्द सार्थकी लागले म्हणजे मग.... :(

yogeshingale


कवि - विजय सुर्यवंशी.

आभारी आहे योगेश शिंगले...... :)

sweetsunita66