तुझ्याविना जगताना.....

Started by प्रशांत दादाराव शिंदे, July 24, 2013, 04:43:04 PM

Previous topic - Next topic
तुझ्याविना जगताना
मी तुझीच होऊन गेले
हातात हात असताना
हात कधीच  मागे सुटून गेले....

तुझ्यावर  प्रेम करत गेले मी
अन....
तुला ते सांगताना शब्दच  सारे हरवून गेले ....

तुझ्या प्रीतीच्या खेळात
मी  सख्या नेहमीच डाव हरत गेले
तुझी होता होता आज  माझेही मी न  राहून गेले .......

तुझ्याविना जगताना
मी तुझीच रे होऊन गेले ..........
  -
• ©प्रशांत शिंदे•