न कळे मजला कां

Started by Sadhanaa, August 21, 2013, 03:21:05 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

न कळे मजला कां
  गुंफिती काव्य पंक्ती
किं आस दूर करण्या-
     जीवनाची विरक्ती
संध्याकाळी जीवनाच्या
   दिशा कशी उजळेल
विझल्या निखार्यातून
    आंच कशी मिळेल
रवि -सुमन अबोल
   कां जोडतात नाते
पाहून स्मित सुमनांचे
   काव्य कसे स्फुरते
नाही झाला स्पर्श रविचा
      तरी सुमन हांसते
आशेच्या किरणांनी
     तें-उमलेले दिसते
उषःकालची किरणे तीं
    कोमल जरी भासती
दुपार होता परि त्या तापाने
     "ती"करपून जाताती
जाणुन स्थिति सुमनांची
      पडे रविंस भ्रांत
स्पर्श करावा कि न करावा
      तो म्हणून संभ्रमांत
कोडे नच उकले परि
    भाव फूलांचे जाणतो
उत्तर त्याचे म्हणून तो
  आभाळांस पुसत राहतो
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/love-poem_9.html

sweetsunita66