ताकद तुझ्या सौंदर्याची....

Started by सतीश भूमकर, October 22, 2013, 07:33:40 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

नाजूक तुझी काया सखे
त्या वादळासमोर काय होईल.??
उठला जर बेभान वारा तर,
माझी बाहुली जणू उडून जाईल

पण मलाच नव्हत माहित कि,
माझाच अंदाज चुकीचा होईल
उठलेला तो बेभान वारा ही
तिच्या रुपाला भुलून जाईल

बघताच ती सोंदर्यवती समोर
ते वादळ ही आटोक्यात येईल
अन स्पर्शून तिच्या गालांना
केस तिचे उडवत हळुवारपणे निघून जाईल......

@सतीश भूमकर

मिलिंद कुंभारे


सतीश भूमकर