देवयानी...

Started by shailesh.k, October 23, 2013, 03:33:11 PM

Previous topic - Next topic

shailesh.k

काल उतरला चंद्र धरा
सांगे शोधतो एक तारका
झुळूक जणू ती पश्चिमेची
रंगवून गेली क्षितीज केशरी

चहुकडे मग धावत जाई
गेली कुठे गं करून घाई
डोंगर झाडी कडी कपारी
हळवी वेडी गोड बावरी 

चैन पडेना काय करावे
मन पाखरू व्याकूळ व्हावे
सदासर्वदा नजर शोधते
पाहून एक अवचित स्थिरते

रंगपटलावर दिसे एक राणी
जणू खगांची किलबील गाणी
भारावले शब्द सूर वदनी
नाव तिचे सांगे "देवयानी"