किनारा....

Started by शिवाजी सांगळे, October 25, 2013, 03:21:17 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नकोय मला तो
सागर किनारा,
पैलतीर न दिसणारा,
त्याच त्या रेघोट्या
वाळूवरल्या !

नकोय मला
ते किल्ला रचण
स्वप्नांचा,
त्या वरला ध्वज,
तूझ्या दुपट्याचा !

तरीही, डुंबेन मी,
त्याच अथांग सागरात,
ज्याच्या लाटा,
थडकाताहेत किनाऱ्यावर,
जेथे तू उभी आहेस !



© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com   +91 9422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९