नव नातं

Started by pujjwala20, November 11, 2013, 06:40:36 PM

Previous topic - Next topic

pujjwala20

तुझा जिव्हाळा कसा लागला
नच उमजेना मला
संगत तुझी रे हवीच वाटे
हौस मनी ही नवीच दाटे
पुरी होइना माझी आशा
दुर जायची नकोच भाषा
विशाल हृदय हे तुझे उसळ्ते
प्रितीची वर लाट लहरते
स्पर्शुन जाते ती पायाला
की स्पर्शते मम हृदयला
दुग्धासम ह्या लहरती लाटा
धाव घेती अनेक वाट
धावती त्या किना-याकडे
मोहक हास्य जनू तेच तुझे गडे
रुप साठले नयनात
तुझीच गाज कानात
दिशादिशातुन दिक्कालातून
वहात जावे तुझ्या पात्रातून
हौसमौज ही किती पहावी
गिते मनीची गातच रहावी
तुझ्या उदरातून सुर्याने यावे
तेज तयाचे पुन्हा तुच गिळावे
तुझ्या ठायी सर्व समावे
तुझचरणी मज स्थान मिळावे
शिळा बनूनी पडूनी रहीन
किंवा किणारी माती होईन
सांग जुळेल का नाते नवते
तुझसाठी त्यागेन मी जग झगमगते

( समुद्र पाहुन )

....................... उज्ज्वला पाटील  :)  :)  :)

rahul.patil90

#1

समुद्र पाहून त्या पुढची कविताची प्रयत्न मी केला होता आणि माझी कविता मी अगोदर पोस्त केली आहे पण तुमच्यासाठी परत पोस्त करत आहे त्या बद्दल क्षमश्व आहे.
तुमच्या कविताचे भाव खरच मनात उतरणारी आहे, अप्रतिम कविता.



नवं नातं

किनाराण्यावर आदळ्लेली लाट
पुन्हा मागे वळ्लीच नाही
ती झिरपून गेली तिथेच
कशी ती कुणाला कळ्लीच नाही
स्पर्शांना अर्थ असतो ते कळ्ल्यावर
माझं बालपण मला सोडून गेलं
आणि जाता जाता नवीन स्वप्नांशी
नातं माझं जोडून गेलं
गप्पच रहावसं वाटतं तुझ्याजवळ बसल्यावर
वाटत तू सगळे ओळखावीस
मी नुसतं हसल्यावर
तुला डोळे भरून बघायचं असत पण
तू जवळ आलीस की डोळेच भरून येतात
आणि बोलायचे म्हंटल तर
शब्द मुके होतात
मला माझी हर मान्य आहे पण
तू जिंक्लीस असे मात्र होत नाही
डाव तुझ्या हाती दिला तरी
जिंक्ता मात्र तुला येत नाही
---------------- राहुल पाटील

© राहुल पाटील

pujjwala20