सखी संगे

Started by Sadhanaa, November 29, 2013, 04:13:54 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

सखी संगे जीवनांत

नंदन वनीचे सुख होते

कुबेराचे धन आणि

शीतल चांदणे होते ।



सखीच्या स्वरांत माझ्या

निर्झराचे गीत होते

शरिराच्या हालचालीत

अप्सरांचे नृत्य होते ।



श्वासांत मम सखीच्या

गंध अनेक भरले होते

मनामध्यें तिच्या कारण

वात्सल्य ओसांडत होते ।



म्हणूनच क्षणा क्षणाला

मला तिची आठवण होते

न ती जवळ नाही याचे

दुःख कायम सलत रहाते । । रविंद्र बेंद्रे

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/love-poem_16.html

शिवाजी सांगळे

कविता चित्ररुपात पोस्ट करायची असल्यास कोणत्या साईटवर जावे या बद्धल माहिती देऊ शकाल का?
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Sadhanaa

Sorry I dont know about it
Sadhana