स्पर्शपलीकडलं प्रेम

Started by amoul, November 30, 2013, 03:35:04 PM

Previous topic - Next topic

amoul

तसं फार तर एक वर्षापासून भेटतोय,
तेच तळं तोच काठ.
तिचा उजवा माझा डावा हात.
पण एवढंच, यापुढे कधीही काहीही गेलेलं आणि केलेलं नाही.
फक्त सवांद सुरु असतो....... मनांचा, भावनांचा, संवेदनांचा.
कधी राग, रुसवा पण तोही फसवाच.
तशी ती खट्याळ, अवखळ पण निरागस.
मी शांत.............
दोघांचीही विचार करायची पध्दत निराळी,
तरी कोण जाणे कशी फुलली अलवार प्रेमाची कळी.

आज दुपारी जवळ आली,
म्हणाली "मी आई होणार आहे तुझ्यामुळे"
आसमंत चमकलं डोळ्यापुढे,
तरी माझ्या ओठांवर बोट ठेऊन बोलत राहिली,
म्हणाली, " हो मला डोहाळे लागलेयत तुझ्या सारख्या विचारांचे,
तुझ्या भावनांनी स्पर्श केलाय मला,
माझ्या मनाच्या हर एक संवेदनांना.
इतके दिवस भेटतोय पण आज फुलालेय मी,
जाग आलीय माझ्या भावनांना.
फक्त तुझेच विचार माझ्या श्वासात आहेत,
त्यांच्याच स्पर्श पुन्हा पुन्हा मला आतून जाणवतोय.
सृष्टीकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याची तुझी वृत्ती आज माझ्या अंतरी पोसली जातेय,
आज मला जो जाणवतोय......
तो उद्या सर्वांना दिसेल....... माझा बदललेला पिंड.
तेव्हा सांगेन सर्वांना हे सारं तुझ्याचमुळे, तूच याला कारण.
जशी कुण्या गर्भवतीची चकाकतेना कांती,
तशी माझ्याही डोळ्यात चकाकतेय बघ लकाकी.
तुच शिकवलस.........
फुला सारखं उमलायला,
चंद्रासारखं झुलायला,
पावसासारखं बरसायला,
आणि चांदण्यांसारखं  हसायला.
आता प्रत्येक कृतीतून जो विचार प्रसवेल ना...... तो तुझाच असेल"

स्पर्श हा केवळ शरीर बांधतो,
पण ते केवढं ......कुणी नसतांना, एकांतात.
बंधनं असतात ना त्याला,
आज कळलं स्पर्शाच्या पलीकडेही प्रेम असतं,
कुठलंही बंधन नसतं त्याला,
ते शरीर तर बांधतच पण आत्माही बांधत.

बरोबर सांगत होती ती,
उगाच नाही माझा आत्मा आज नुसता माझा नसल्यासारखा वाटतोय मला.



..........अमोल

Çhèx Thakare

कवितेच्या हाल्फ पोर्शन पर्यंत जे वातावरण निर्माण केलय ना एकदमच अप्रतिम .. आणी मग भावनेचे एक एक पैलू ऊलगडत गेला खूप सुंदर,  तूझे शब्द वाचले अन प्रांजकूश ची अठवण आली,  खूप छान,  खूप दिवसा नंतर एक चांगले काव्य वाचायला मिळाले खूप खूप शूभेच्छा तूला ...  :)