आज त्याची अन माझी पहिली भेट होती... ओळख मात्र जुनीच होती...

Started by suchitra shedge, January 18, 2014, 10:42:58 AM

Previous topic - Next topic

suchitra shedge

आज त्याची अन माझी पहिली भेट होती...
ओळख मात्र जुनीच होती...

नजरेने नजरेशी बोलणं सुरूच होतं...
पण ती अबोल भाषा मात्र जुनीच होती...

मनात प्रश्नांचं काहूर उठलं होत...
मनातली हालचाल मात्र तीच होती...

हातात एक गुलाबाच फुल होतं....
दरवळणारा सुंगंध मात्र जुनाच होता...

आज नव्याने हात हातात होते...
जाणवणारा स्पर्श मात्र तोच होता...

हृदयाची धडधड तर खूप वाढली होती...
स्पंदने मात्र तशीच सुरु होती...

इतक्या दिवसांनी झालेल्या भेटीने डोळे पाणावले होते...
पण डोळ्यातलं पाणी लपवण्याची पद्धत जुनीच होती..

आता पुन्हा परतण्याची वेळ आली...

एकमेकांपासून वेगळं होण्याची वेळ आली...

आता खरच एकदा एकमेकांना कडकडून मिठी मारून
खूप खूप रडण्याची वेळ आली...

आता पाय परतीच्या वाटेवर निघतच नव्हते....
पण आता निरोप द्यायची तर वेळ आली...

डोळ्यांत साचलेल पाणी घेऊन शेवटी दोघेही निघालो...

तयार झालेल्या नवनवीन आठवणी घेऊन निघालो...

ओठांवर एकमेकांसाठी असणारं गोड हसू घेऊन निघालो..

खरच सांगायचं तर अश्या अनेक भेटींची ओढ लागली...
जी ओढ अगदी पहिल्यासारखी होती...

आज त्याची अन माझी पहिलीच भेट होती...

ओळख मात्र जुनीच होती...

ओळख मात्र जुनीच होती....


- Suचित्रा Sheडगे