तुझी वाट पाहतो आहे

Started by jainrohit, March 05, 2014, 10:14:52 PM

Previous topic - Next topic

jainrohit

काय होते ते दिवस
काय होता तो काळ
काय ते प्रेमाचे निकष
काय ते प्रेमाचे नवस
नि त्या फुलांच्या माळ

एकाएकी काय झाले , कोणास ठाऊक ...
हवेत कोलमडले पत्त्यांचे घर ....
हरलो आम्ही प्रेमाचे समर

काही आठवणी आहेत घनदाट , घनदाट पाहतो आहे ....
कोलमडलेल्या रस्त्यांवर , तुझी वाट पाहतो आहे

विध्वंसानंतर देखील  येतो ,
परिवर्तनाचा वारा ...
जो ओल्या झाख्मांना देतो ,
क्षणभरचा निवारा

विध्वंसानंतर येणारी , ती नवी लाट पाहतो आहे ...
कोलमडलेल्या रस्त्यांवर , तुझी वाट पाहतो आहे

प्रेमदेखील एक नाट्य...
सकाळ जग आहे नेपथ्य
यात फक्त आहेत शल्य ...
जिंकतो   फक्त असत्य

निशेत पावलांनी जी उठते , ती घबराट पाहतो आहे ....
कोलमडलेल्या रस्त्यांवर , तुझी वाट पाहतो आहे
[/size][/color]

ashok wandhare