ऐसे जीवन दिले देवा..............

Started by प्रशांत दादाराव शिंदे, March 14, 2014, 03:18:43 PM

Previous topic - Next topic
ऐसे जीवन दिले   देवा
सुख कुठेच माझे नव्हते
प्रेमासाठी धडपड केली
पापणी नेहमीच ओली राहिली  ............

ऐसे जीवन दिले  देवा
अंधारच अंधार भेटला

आधार घ्यावा वाटला थोडा
तिथे दगाच  बक्षिसी भेटला ..................

रिकामे हाथ होते माझे
नशिबही कोरेच राहिले

वाढले स्वप्न पाखरासारखे
झेप घेताना स्वप्नांची
मग  ते  पांगळेच राहिले ......

ऐसे जीवन दिले देवा
क्षणभरही सुख अनुभवायचे नाही
साधे भोळे वागणे माझे
सूत्र एवढेच "कुणास दुखवायचे नाही "

भरभरून वाटले प्रेम नि माया मी
कारण एवढेच देऊ शकलो
पण मी मागणी केली तेव्हा
माझ्यासाठीच मात्र ती संपली .....................
ऐसे जीवन दिले देवा
मरणही लाभले नाही
निराशांचेच मला दोस्त भेटले
दुखांशिवाय कुणीच  नाही ................

विदुषकच रे मी 
इथे पायातल्या  चप्पलचे हि   वर्चस्व 
माझ्या जीवाला इथे जराही  किंमत  नाही   

डोळ्यांत रक्त आले
आज  आसवांनी हि साथ सोडली
तरी नाही बोलणार तुला
कारण  क्षुद्राला ह्या
जगण्याचा तर हक्कच रे नाही........

एक छोटी इच्छा  मनी माझ्या
एवढं  तरी ऐकशील का??

पुरे जगणे झालं हे  आता
भिक म्हणून तरी  मृत्यू देशील का ?
निरर्थक ह्या श्वासांना थांबवून
विसावा थोडा देशील का ? .............

ऐसे जीवन  दिले  देवा
शेवटी  हातही   नांगडेच  राहिले
प्रश्नांचेच आयुष्य देउनि
उत्तरांनीच   जन्म घ्यायचे राहिले  ..............
-
©प्रशांत डी शिंदे ....
दि.१४/०३/२०१४


arpita deshpande

आकाशाचे स्वप्न पाहीन
जिद्दीने उभाच राहीन
सोडून देईन कायमच निराशा
सोबत असेल आनंद आशा ....

ALWAYS BE POSSITIVE....:)

RAAHUL

khup chaan..........ekdam manala bhidel asa lihilas.......

vijaya kelkar

 छानच,
''ह्याला जीवन ऐसे  नाव
येईल आपल्या ही हाती डाव '' :)  :)


khup chaan..........ekdam manala bhidel asa lihilas.......
dhanyvad rahul ji ...


छानच,
''ह्याला जीवन ऐसे  नाव
येईल आपल्या ही हाती डाव '' :)  :)

dhanyvad vijayaji..