लग्न

Started by nikhil misal, April 09, 2014, 12:11:27 AM

Previous topic - Next topic

nikhil misal


लग्न पहावं करून अन घर बघावं बांधून..खरचं बोलतात ते
काही खोटं
नाही..हल्ली जिकडे तिकडे
लग्नाची रेलचेलचालू आहे.पण लग्न जमणं
म्हणजे तेवढी सोपी गोष्ट
राहीलेली नाही आहे.पुर्वी मोठ्यानी जो निर्णय
घेतला तो शिरसावंद्य ठेवून लग्न कराव लागायचं पण
हल्ली परिस्थिती बदललेय..तेव्हा येवढ्या अपेक्षा नसायच्या.आता खुप
मोठ्या अपेक्षा ठेवून लग्न करायला निघतात.मुख्यत:
मुलींच्या अपेक्षा खुप मोठ्या असतात..मुलगा एकवेळ
मुलगी दिसायला सुंदर असेल तर
आपल्या शिक्षणाच्या अपेक्षा बाजूला ठेवून लग्नकरायला तयार
होतो.पण मुलींच तस
नाही..त्यांना आपल्यापेक्षा जास्त
शिकलेला मुलगा हवा असतो..शक्यतो मुलाला गवर्मेंट
नोकरी असावी अशी अपेक्षा असते...पण
ही अपेक्षा ह्या काळी कितपत योग्य
आहे! जुन्या काळी खाजगी क्षेत्र इतक
फ़ोफ़ावल नव्हतं जितकं आता आहे..त्यामुळे
सहजासहजी नोकरी मिळते..पण
मुख्यत:
मुली पेक्षा तीच्या बापाच्या अपेक्षा जास्त
असतात..अन त्या असाव्यातही..पण
इतक्याही नसाव्यात
की मुलीच्या आयुष्याची राख
रांगोली होईल..ह्या अपेक्षामुळे बहुतेक
मुलींची लग्न जमत नाही.अन
ह्यामध्ये वय निघून जातं...टेन्शन वाढत जातात अन
त्याचा सगळापरिणाम त्यांच्या घरगुती जीवनावर
होतो..अन मग शेवटी दुधाची तहान
ताकावर भागवावी लागते..मला एक समजत
नाही ह्यांना मुलगा आपल्याइतका शिकलेला का चालत
नाही..गवर्मेंट् चं का हवा..म्हणजे एकतर
अजूनही आपल्यावर पुरुषाचं वर्चस्वअसावं अस
ह्यांना वाटतं.घटनेनं स्रियांना पुरुषाच्या बरोबरीने
चालण्याचा अधिकार दीला आहे.मग नवर्याबद्दल
आपल्या येवढ्या अपेक्षा का?आपल्यापेक्षा ­
कमी शिकलेला मुलगा का तुम्हाला चालत
नाही?ह्याच एकमेव कारण म्हणजे लाज...समाज
काय म्हणेल..आपल: स्टेटसं कमी होईल..फ़क्त
अन फ़क्त तुम्ही समाजाचा विचार करताय अस
तुम्हाला वाटत नाही का?
आपल्या मुलीचा तीच्या आयुष्याचा विचार
करतोय का?माझं अस म्हणन
नाही की मुलगा आपल्यापेक्षा कमी शिकलेलाच
करावा,पण अस म्हणेन ज्या मुलींच शिक्षण
कमी आहे त्यानी कमावता मुलगा शोधावा पण
ज्याच शिक्षन खुप झालेलं आहे
त्यांनी मुलगा आपल्यापेक्षाकमी शिकलेला असेल
त्याला भले तुमच्यापेक्षा पगार कमी असेल
तरी चालेल.अश्या मुलांशी लग्न
करावं..कुठतरी तुम्हाला नमतं घ्यावं लागेलचं
हो त्याशिवाय पर्याय
नाही.अन्यथा पश्चातापाची वेळ
आल्याशिवाय राहणार नाही.काहीजण
अनुभवत ही असतील..आपण
नेहमी म्हणत असतो नाय रे जमायचं असतं तर
लगेच जमलं असतं..पण तुम्ही जमवून घेत
नाहीत नाम्हणून ते जमत
नाही ह्याचा विचार करतोय
का आपण.नशीब आपल्याला खेळवत
नाही आपण नशीबाला खेळवत
आहोत.काळ बदललायं आपल्यालाही त्याप्रमाणे
बदलायला हवं.नाहीतर
ह्या काळप्रवाहाच्या रस्त्यातून आपण कधी बाहेर
फ़ेकले जावू हेआपलं आपल्यालाही कळणार
नाही.हल्ली लग्न म्हणज़े व्यापार
झालायं.लग्नासार ख्या चांगल्या गोष्टीला बट्ट्या लागत
चाललेला आहे.अन हा बदल असाचं घडणार
नाही आहे..हे
तुम्ही आम्हीच बदलवू
शकतो.

थोडा विचार करा.....