गारपीट

Started by Pravin Raghunath Kale, April 11, 2014, 10:45:31 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

गारपीटीच्या तडाख्यात
शेतरान सारं ऊध्वस्त
याच नजरेसमोर
धनधान्य सारं फस्त
नजरेत दाटला पाऊस
जगण्याची नाही उरली
कोणतीच हौस

शिवारातील स्वप्न
स्वप्न च राहीली
कोणतीच आशा
जगण्यात नाही उरली

नियतीचा घाला
या जगण्यावर
स्वप्नही विरली
आशाही विसरल्या
नशीबी फक्त
दुःखच राहीलं

दूःखान जगण्यात
अर्थच नव्हता राहीला
शेवटचा उपाय
त्याला तो दिसला

कर्जाच्या डोंगराखाली
परिस्थितीच्या नियतीखाली
जीवन त्याने टांगले
फाशीच्या दोराखाली

जगण्याच्या शर्यतीत
हरला तो शेतकरी
जिंकले का तो केव्हातरी
का हे असंच राहील
अजून किती घडतील
ह्या अशाच घडतील
आत्महत्या !! आत्महत्या !!



Pravin Raghunath Kale
8308793007