प्रेमाची निवडणूक...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., April 17, 2014, 12:51:32 PM

Previous topic - Next topic
प्रेमाची निवडणूक...!!

प्रेमाची निवडणूक आता,

मी ही लढवणार आहे.....

भावनाचा आधार घेऊन,

शब्दांचा प्रचार करणार आहे.....

मनाला उमेदवार बनवून,

स्वप्न निशाणी ठेवणार आहे.....

तुझ्या ह्रदयाच टिकीट मिळवून,

आमदारकी मिळवणार आहे.....

तुझ्या होकारच मत मिळवून,

बिनविरोध निवडून येणार आहे.....
♥  :-*  ♥  :-*

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक १७/०४/२०१४...
दुपारी १२:३६...
©सुरेश सोनावणे.....