सार्थक जीवनाचे..

Started by श्री. प्रकाश साळवी, April 23, 2014, 11:30:28 AM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

सखे ग आज मी धन्य धन्य झाले,
जीवनाच्या सरोवरी एक "कमळ" उगवले,

जिकडे तिकडे हर्ष दाटला
अंतरंगी जणू "मित्र" उदेला
वायुने परी गंध पसरिला
कसे करू मी स्वागत याचे,
ध्यास मनी हा लागला ----------- १ .
**
काऊ यारे चिवू यारे
मम बाळाचे स्वागता रे,
"आई" होण्याचे मज लाभले रे
भाग्य माझे कसे उदेले
हर्षित झाले मन माझे रे ------------ २ .
**
या ग या सयांनो सत्वर
गुपित माझे पुसा भराभर
चैन पडेना मजल क्षणभर
माझिया मनीच्या बनात
नाचू लागे थुई थुई मोर ------------ ३ .
**
रंध्रात माझिया भिनले रे
राजसा तुझिया मोहाचे क्षण
आज असावा तू जवळी तर
सार्थकी लागले माझे जीवन
या आनंदाचा तू पण भागीदार ----------- ४ .

श्री प्रकाश साळवी दि. २३ एप्रिल २०१४.