ते गेले कुठे?

Started by श्री. प्रकाश साळवी, May 03, 2014, 03:25:42 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

ज्यांच्यासाठी तू दमला ते आहेत कुठे?
जेंव्हा गरज तुला त्यांची ते गेले कुठे?

जखमा उरात झेलत तू धावला तेंव्हा
जखमेवर मीठ चोळण्या पाहिजे ते गेले कुठे?

काट्याचे वार झेलुनी हृदय तुझे रक्ताळले
हळुवार फुंकर मारण्या पाहिजे ते गेले कुठे?

डोक्याला वसने गुंडालुनी लाज त्यांची तू राखली
नग्न व्हायला आले तुझ्या नशिबी ते गेले कुठे?

तोंडचे तू घास काढुनी भूक त्यांची भागविली
खायला मिळे न तुजला तेंव्हा ते गेले कुठे?

स्वार्थ बाजूस सारुनी जीव त्यांचे तू वाचविले
परमार्थ करता तू आता ते गेले कुठे?

श्री. प्रकाश साळवी दि. ०३ मे २०१४

sopan nevhal patil