माझ्या ईतका तोहि तिच्या प्रेमात चिँब भिजला होता...

Started by Tushar Bharati, May 11, 2014, 05:40:23 PM

Previous topic - Next topic

Tushar Bharati

माझ्या ईतका तोहि तिच्या प्रेमात चिँब
भिजला होता
त्या दिवशी तुला पाहुन चक्क
पाउस लागला होता

खंडाळ्याच्या घाटात धुक्यात लपला होता
मि दिसताच तिला भेटण्यास
माझ्या आधी धावला होता
मि मात्र तरसत होतो, विव्हळत होतो
कारण माझ्या आधीच
तो तेथे पोचला होता
अनं त्या दिवशी तिला पाहुन चक्क पाऊस
लागला होता..।

कधीच न भेटल्यासारखा
तरसत होता
तिला मिठीत घेण्यासाठी मुसळधार बरसत
होता .
तिच्या अनाहुत चाहूलीनेच कि काय
त्या दिवशी तिला पाहुन चक्क
पाउस लागला होता..।

तिझ्या देखण्या रुपावरुन ओघळत होता,
तिच्या नागमोड्या लांबसडक केसांवरुन
पाझरत होता

कधी रिमझीम तर कधी मुसळधार कोसळत होता,
तिला स्पर्शुन हळुच जमीनीत विरत होता
वाकुल्या दाखवत जणु एकप्रकारे मला
डिवचतंच होता
अनं त्या दिवशी तिला पाहुन चक्क पाऊस
लागला होता..।

माझ्या अनं पावसाच्या अशा या स्पर्धेची अखेर
सांगता झाली.,
सर्व डावलुन ति माझ्याकडेच आली...
हातात हात घेउनी डोळे भरुनी पाहु लागलीँ....!

फुललेली हि प्रित पाहुन पाऊस आणखीनंच
कोसळत होता,
विव्हळत होता,
तिच्या स्पर्शाविना तरसत होता...
तिला माझ्या मिठीत पाहुन जणु माझ्यावरचं
जळत होता....।

खरंच माझ्या ईतका तोही तिच्या प्रेमात जणु
चिँब भिजला होता
त्या दिवशी तिला पाहुन चक्क पाऊस
लागला होता...।


कवि:- तुषार भारती (Tush)
.



....╔══════V════ ═
════════════╗
·•·.·´¯`·.•·
TUSH ♫♪
·•·.·´¯`·.•·
╚════════════ ════════════╝
(¯`V.´¯)
`•.¸T.•´
☻/
/▌ ;D