मनातला वसंत

Started by harshmpawar, May 19, 2014, 02:28:28 PM

Previous topic - Next topic

harshmpawar

मनी वसंत फुलता
तोल सुटाया लागतो
तुझ्या गोऱ्या पावलांचा
रंग चळाया लागतो

मन गुंतुनिया जाते
पार कामातून जाते
तुझ्या साध्याच रूपाने
काय विपरीत होते?

बघ इथे येउनिया
आग माझी घेउनिया
शांत कर हाक माझी
तुझी कव देऊनिया

सुख स्वर्गाचे मिळाले
दुख नव्हते कळाले
अर्थ प्रेमाचे अनेक
एका मिठीने कळाले

- कवी माधव पवार
Poem Narration by Harshvardhan Madhav Pawar on YouTube - http://goo.gl/be0nR7