आवडतं मला पुन्हा नव्याने तिचे व्हायला ..........

Started by प्रशांत दादाराव शिंदे, May 21, 2014, 12:00:52 PM

Previous topic - Next topic
सोपं आहे आपलेसं करणं
प्रेम करणं मात्र कठीणच

गुलाब किती सुंदर असतं
काट्यासारखं  सोबत राहून  जगणं
आहे खूप कठीणच

आवडतं ते गुलाब सर्वांनाच
पण जीव त्याचा त्या काट्यांतच

असंच आहे आमचंही हि नातं
आंबट कधी
तर कधी खूप गोडच
तूटून  पडलो तरी
आवडतं मला पुन्हा नव्याने तिचे व्हायला ..........

-
©प्रशांत डी शिंदे
दि.२१-०५-२०१४