मी भट!

Started by केदार मेहेंदळे, July 01, 2014, 03:24:05 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

जानव्याला गाठ येथे
चालतो मी ताठ येथे

काय मागू दान, माझी
पूर्वजांशी गाठ येथे

वारश्यानी लाभले मज
ज्ञान भरले माठ येथे

संपले ना ऋण त्याचे
लागले मज साठ येथे

मी प्रवाही वाहिलो पण
सोडला ना काठ येथे

संकटांना मी कधीही
दावली ना पाठ येथे 

वाटला मी गोड आंबा
चोखली अन बाठ येथे

का विचारू? ''हक्क कसले?''
सर्व मुद्दे पाठ येथे

पाच दशके लोटली पण
मागणारे राठ येथे

स्वबळावर धाव तुही
ये भटाला गाठ येथे


केदार...

लगावली : गालगागा  गालगागा
मात्रा : ७ + ७ = १४
 

sweetsunita66


sucheta Ranade


sucheta Ranade