मी, ती आणि तो... पाउस

Started by शिवाजी सांगळे, July 12, 2014, 07:24:33 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे







पावसाचा थेंब वारा, येई अंगावरी शहारा !!

सर पावसाची हलकेच येऊन गेली,
तुझ्या कुंतलाची पांघरून शाल गेली !
अलगद कवेत जीव उबदार झाला
श्वासात श्वास जसा प्राणवायू पाझरावा !

पावसाचा थेंब वारा, येई अंगावरी शहारा !!

केंव्हातरी वाटते असे रोज घडावे
उधळून सूर पावसाने चिंब गोठवावे !
तळव्यावर थेंबाचे मोर नाचतांना
धुक्यातील दवांनी धरू नये दुरावा !

पावसाचा थेंब वारा, येई अंगावरी शहारा !!

पानांतल्या फुलांनी हलकेच डोकवावे
फुललेल्या फुलांनी गोड स्मित दयावे,
लखलखत्या नृत्याने मृदगंध दरवळावा
रंगानी इंद्रधनुच्या मयूर हि शरमावा !

पावसाचा थेंब वारा, येई अंगावरी शहारा !!

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९