पाऊस कधीचा पडतो..

Started by श्री. प्रकाश साळवी, July 14, 2014, 03:48:08 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

घन गर्जत आले मेघ
पाण्याचे टपोरे थेंब
पाऊस कधीचा पडतो,
मन झाले ओलेचिंब    = १ =

झाली धरणी शांत शांत
मेघ आले बरसत
पाऊस कधीचा पडतो
कृषीवल झाला निवांत  = २ =

रस्त्यावर झाले पाणी
टळेल का आता  पाणीबाणी?
पाऊस कधीचा पडतो
आता नको हुलकावणी  = ३ =

पावसाचे झाले आगमन
पुलकित झाले तन मन
पाऊस कधीचा पडतो
आनंद झाला मनोमन = ४ =

श्री प्रकाश साळवी दि १२ जुलै २०१४