आता काही सांगायचे राहिले नाही...

Started by श्री. प्रकाश साळवी, July 14, 2014, 04:06:58 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी



आता काही सांगायचे राहिलेच  नाही
भूत वर्तमान पाहिले भविष्य पहिलेच नाही.

क्षण जीवनाचे कित्येक भोगले मी
कित्येक सोसले नी कित्येक सोसलेच नाही,

इमले आकांक्षांचे कित्येक बांधले मी
किती एक  जमले, कित्येक बांधले नाही,

आशा निराशेचा खेळ खेळलो मी
नेहमीच मी हरलो, कित्येकदा जिंकलोच नाही,

सुखाच्या नद्या किती वाहून गेल्या
थोडे सुख साठवून ठेवलेच नाही,

मनाशीच माझ्या पाठशिवणीचा खेळ खेळलो,
एकदा कधी जिंकलो, बाकी कधी जिंकलोच नाही,

भूत वर्तमानाचे गणित मांडले मी
वर्तमानात कधी रामालोच नाही,

दुखाचे सागर कितीदा पोहलो मी
शिंपले सुखाचे शिंतोडे, सुख काय ते भोगलेच नाही,

संसार सुखात अखंड वाहून गेलो,
परमार्थाचा शोध कधी घेतलाच नाही,

आता कधीतरी मी निराश होतो,
आस आशेची मात्र सुटतच नाही,

श्री. प्रकाश साळवी, दि. १४ जुलै २०१४.