असा पाऊस पाऊस ...

Started by Jai dait, July 16, 2014, 10:26:14 AM

Previous topic - Next topic

Jai dait

असा पाऊस पाऊस [/size]
जसा पिंजला कापूस
थेंब झेल अंगावर
नको कोरडा राहूस


असा पाऊस पाऊस
नको जीव तू जाळूस
खेळ चाले या सरींचा
नको एकटा राहूस


असा पाऊस पाऊस
नको सोडून जाऊस
हुरहूर अशी मनाला
जाताना नको लावूस



असा पाऊस पाऊस...