एवढ कर

Started by शिवाजी सांगळे, July 19, 2014, 03:11:20 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

एवढ कर

आला का पाऊस?
तुमच्या गावाला?
इकडे त्याने भिजवून   
टाकले पार आम्हाला।

नव्हता येत तोवर
पहात होतो त्याची वाट,
आल्यावर मात्र त्याने
लावली पुरीती वाट।

तुंबतात गटारे सारी
ट्राफीक होते जाम,
सुस्त नगर पालिकांना
हकनाक वाढते काम।

जीवन रेखा रेल्वे
होते आपोआप बंद
दांडी व्हावी कामावर
असतो काहींना छंद।

जन जीवन तुझ्या मुळे
व्हायला नको कधी बंद,
पोटासाठी धावतात सारे
आम्हा भिजण्या आनंद।

येत्यावर्षी एवढ कर
सोडून शहरं सारी,
धरणात, गावी शेतात,
बरसवं धुंवाधार सरी।

आमच्याकडे एक कर
रीमझीम पडूदे शाॅवर,
पडायचे जरी तूला खुप
तेव्हढं स्वतःला आवर।

©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९