ती राधा...

Started by शिवाजी सांगळे, July 22, 2014, 08:47:41 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे



खुपच दिवसांनी
आज भेट झाली,
तीच हसरी मुद्रा
चेहऱ्यावर लाली !

डोळ्यात स्वप्ने
कित्तेक साठलेली,
भेटला जिवलग
म्हणुनी आनंदलेली !

किती, काय सांगू?
कोडयात पडलेली,
स्वत:लाच क्षणभर
विसरून हरवलेली !

वाटू, लुटू किती?
प्रेमा आसुसलेली,
शाम सावळ्याची
ती राधा जाहलेली !

©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९