मैत्री

Started by विक्रम पाटील दिग्दर्शक, July 23, 2014, 12:09:10 AM

Previous topic - Next topic

मी पुष्पा मैत्रीचे प्रितिहुनि सुगंधी
सुगंधात माझ्या मदिरेहुनि धुंदी
कुसून-मधुकर , पृथ्वी-प्रभाकर सारेच आजवर मैत्रीत रंगले
मैत्रीच्या रंगत रंगताना बंधनात फसले
मैत्रीच्या रंगात, भावनांच्या बंधनात सारेच गुंतले
मी बंधन मैत्रीचे वार्याहुनि बेधुन्दि
जो धुंदीत माझ्या वाहिला तो सर्वात आनंदी
मी पुष्पा मैत्रीचे प्रितिहुनि सुगंधी
सुगंधात माझ्या मदिरेहुनि धुंदी
धुके समजुनी धुरात बसला , चंद्र पाहुनी गालात हसला
वेड्या मैत्रीत हा खेळ कसला , मित्राला पाहुनी मित्र हसला
जो प्रीतीत गुंतला मैत्रीस मुकला
फुल पाहुनी काट्यात गुंतला
जो मैत्रीस समाजाला , जीवनात सजला
चन्द्रहुनि चांदण्यात रंगला
तो वृक्ष मैत्रीचा चन्दनाहुनि सुगंधी
सुगंधात त्याचं कस्तुरेचि धुंदी

कवी - विक्रम पाटील दि . १८-०८-१९९८