शेज ही बोलते...

Started by madhura, July 28, 2014, 10:09:39 AM

Previous topic - Next topic

madhura

शेज ही बोलते...

तो: शेज ही बोलते, मौन तू का अशी
ती: चंद्र मी झेलता, भाव तोलू कशी
तो: याद येता जशी, भेट ती जन्मीची
ती: श्वास वागे तसा, होई माझी स्थिती
तो: पाकळ्या स्वैर झाल्या
ती: चांदणे गोठले
तो: अत्तरी स्पर्श होता
ती: तू कुठे, मी कुठे?

ती: सांग तू रे सख्या,
कुठे स्वर्ग तो अन् कुठे ती धरा?
तो: कापुरासारखे भासते का तुला?
ती: मूक झाले, कसा श्वास रे विंधला
तो: पारखे सुर झाले गडे ग मला.....

तो: माळशी जाळशी, मातला मोगरा
ती: चंदनी गारवा चेतवे ज्योतीला
तो: प्रणयप्रितीत धुंदले, भृंग ते
ती: फुलली ही फुले, बोल कोणामुळे?

मकरंद