निळ्या आकाशी

Started by केदार मेहेंदळे, July 28, 2014, 11:35:53 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 निळ्या आकाशी
द्वाड वार्यांनी
काळे ढग
असे जमवले

जणू .......................

निळ्या पाटीवर
गिचमीड रावांनी   
खरडून ठेवली
काळी अक्षरे

मग .......................

बघून त्यांना
गर्जत आले
पाउस मास्तर
असे जोमाने

अन .......................

पुसून टाकली
गिचमिड रावांची
निळ्या पाटीवरची
काळी ढग अक्षरे

अन .......................

मोकळी केली 
आकाश पाटी
नव्याने कराया 
अक्षर भरती

आता.......................

बघताहेत वाट 
वारा मास्तर
काळ्या,  किंवा पांढर्या
अक्षर भरतीची

केदार....