भय मनातले संपत नाही

Started by SANJAY M NIKUMBH, July 29, 2014, 09:01:35 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

भय मनातले संपत नाही
================
सतत एक अनामिक भीती
या माणसाच्या कळपात वाटत रहाते
कां मी माणूस नाही
माझ्याच मनाला विचारत रहाते

दोनच तर जाती माणसांच्या
एक स्री अन एक पुरुष
मग मीच प्रत्येक क्षण जगतांना
कां घाबरत जगत रहाते

जेव्हा नसते स्वतःची ओळख
तेव्हा आई जपत असते
जेव्हा जाणीव होते स्रीत्वाची
तेव्हा मनावर दडपण येते

कां मला माणूस न समजता
सावज म्हणून पाहिले जाते   
माझ्या शरीराकडे पाहून
पुरुषातले श्वापद जागे होते

कुणीही सोम्या गोम्या उठतो
भोगी समजून तुटून पडतो
मला योनी आहे म्हणून
मी मलाच दोष देत रहाते

जेथून हे लांडगे जन्म घेतात
त्याचीही त्यांना चाड नसते
कुणा स्रीच्या अब्रूशी खेळतांना
त्यांची आई आठवत नसते

सामुहिकपणे अब्रू लुटणाऱ्या
या पुरुष जातीची घृणा वाटते
भय मनातले संपत नाही
जीव मुठीत धरून मी जगते

कुठवर चालणार आहे हा खेळ
स्रीला उपभोग्य वस्तू समजण्याचा
पुरुष कधी माणसासारखा वागेल कां
याचेच उत्तर शोधत रहाते
=========================
संजय एम निकुंभ , वसई
दि.२९. ७. १४  वेळ : ८. ३५ रा .