परिवर्तन

Started by शिवाजी सांगळे, August 03, 2014, 12:39:50 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे





देवळात रोज देवाला
अभिषेक दुधाचा होतो,
बाहेर भुकेने आडोश्याला
आक्रोश बालकाचा होतो !

कबरीवर आम्ही चादरींच्या
रोजच घडया मोडतो,
उघडयावर बाहेर तेंव्हा
थंडीत कुणी कुडकुडतो !

मेणबत्ती क्रुसा समोर
लावून नतमस्तक होतो,
उजळवून श्रद्धा क्षेत्र
झोडीत अंधार उरतो !

आक्रोश, थंडी, अंधार
जळूनी दूरवर जावो,
जाणुनी दुख: दुसऱ्याचे
परिवर्तन मनाचे होवो !

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९