आला श्रावण

Started by श्री. प्रकाश साळवी, August 04, 2014, 04:53:05 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

आला श्रावण

धो धो पाऊस
घोंगावणारा वारा
भरून वहाणारया नद्या
फेसाळ लाटांचा किनारा  -1-

अथांग सागर
दूरवर दिसे गलबत
मनात भितीचे काहूर
मनाचे मनाशी खलबत -2-

खोल खोल दरी
झुळझुळ वाहे निर्झर
संथ संथ आहे
बाजूचे हे सरोवर -3-

प्राजक्ताचा सडा
मंद मंद शितल पवन
फुलून आले सारे अंगण
सुगंधीत झाले सारे मन -4-

नेसुन हिरवा शालू
आला श्रावण, आला श्रावण
कधी थोडी शिर शिर
चोहीकडे आनंदाचे क्षण -5-

श्री. प्रकाश साळवी. दि. 04-08-2014

mangeshramgirkar

sharvanach sunder varnanane man shravan sarit bhijun chimba zale