शोधतो वाटा पुन्हा...

Started by श्री. प्रकाश साळवी, August 14, 2014, 07:45:42 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

शोधतो वाटा पुन्हा...
शोधतो वाटा पुन्हा त्या ज्या कधी चाललोच नाही
सोसतो चटके ऊन्हाचे जे कधी सोसलेच नाही
धाडस केले मी कंटकावर चालण्याचे
फूलांत रमण्याचे कधी रूचलेच नाही
आणले तूजसाठी खूडून फूल सोनचाफ्याचे
मोकळ्या केसात तूझ्या ते खोचलेच नाही
शोधित राहीलो सुख भवती भव-सागरात
स्वतःत सुख शोधण्याचे कधी सुचलेच नाही
खेळलो सुगंधात, रमलो गुलाब पुष्पात मजेनेघ
हासलो किती हौसेने, काटे कधी टोचलेच नाही
आयुष्य वेचताना धडपडलो कितीदातरी
जखमा ऊरी ज्या जाहल्या किती? ते  समजलेच नाही
आजपावेतो दू:ख सोशीत आलो सुखाने
भोग भोगण्याचे तरीही अजून संपलेच नाही

श्री. प्रकाश साळवी.  दि.14 ऑगस्ट 2014.