गुरु पौर्णिमा- चिञपट

Started by lanke.amol, August 16, 2014, 12:09:44 AM

Previous topic - Next topic

lanke.amol

गुरु पौर्णिमा:

अवतरले चित्रकथेत आज, एक प्रबळ गुरु आणि एक पौर्णिमा,
अनेक सुखद स्मृति आणि अल्हाद क्षण तुम्ही स्मरवलि आम्हा.

सई आमची शोभून दिसते पौर्णिमेची परी
गुरु स्थानि देखिल अगदी चपखल उपेंद्र प्रतिमाच खरी.

प्रेमाची नवीन परिभाषा सहज अवचित छेडीत स्पर्शिली हृदया
किरणे सोनेरी सूर्याची आणलीत आमच्या पहाटेस उदया

पूर्व सुखद क्षणांचे आभास पुन्हा स्वप्नि दाटते
ते मंजुळ स्वर तिचे आज कानी पुन्हा ऐकावे वाटते

तो समंजस, शांत गुरु आणि सोबत ती निरागस, खट्याळ पौर्णिमा,
रेशिमगाठीत जोडीले एक सुंदर गुंफण देवानेच  तुम्हा

दोना पावला च्या सुंदर नगरात जमले तुमचेही सुंदर नाते
गुरूविना पौर्णिमेचे सारे शृंगारी तेजच रिते

या चित्रांच्या आविष्काराने वाहू दे प्रेम संकल्पनेचा नविन वारा
आतुर होऊन आम्ही श्रोते आता वाट पाहतो सप्टेंबरच्या बारा.

-अमाेल लंके