*उमलुन होईल महान*(भृणहत्या)

Started by madhura, August 16, 2014, 12:49:14 PM

Previous topic - Next topic

madhura

का उठलात जिवावर माझ्या
मि आहे कळी लहान,
मि तर इवली फुलपाकळी
उमलुन होईल महान.

त्याने दिली जर मजला चोच
दाना देईल तोच पाहुनी,
बापा तू का व्यर्थ काळजीत रे
बसलासी दडुनी.

चिमूकलेच पाय माझे
चिमूकलेच हात लहान,
करुनी ओजंळ पुढ्यात तुमच्या
मागते जगण्याचे दान,

मि तर इवली फुलपाकळी
उमलुन होईल महान.

दिवाच हवा तुम्हा सगळ्यांना
मि तर त्यातली वात वाहिनी,
व्यर्थ ठरेल तोही मचवाचुन
तव असाच देशाल कोप-यात ठेवुनी.

फुलू द्या असेच झाङावरती
नका घेऊ माझा प्राण,
पाहून दिपतील चंद्र तारे कर्तृत्व माझे
असा पायावर तुमच्या आणून ठेविल वान,

मि तर इवली फुलपाकळी
उमलून होईल महान.

किती करू आर्जव तुम्हाकडे
मि तर आहे बंदिस्त गर्भातुनी,
येऊ द्या जन्मास मला
प्रेमातुनी प्रेम देईल सर्वञ सांङूनी.

अस्तित्व मि आई तुझे
एकदा मिळव पुन्हा जगण्याचा मान,
पावलांनी माझ्या इवल्याशा
हुङकू जिवनाचे रान,

मि तर इवली फुलपाकळी
उमलुन होईल महान.

            -- प्रवीण सोमासे.

Pravin Raghunath Kale