माझे मलाच कळत नाही !!!

Started by कवि । डी....., August 19, 2014, 10:34:42 PM

Previous topic - Next topic

कवि । डी.....

माझ्या डोळ्यात रोज तुला
आश्रु  पाहील्याशिवाय  करमत नाही
प्रिये तु का आहेस  वैरीनी
माझे मलाच कळत नाही !!

रोज  तुझा नवा डाव
रोज  तुझी  नवी  खेळी
चुक  माझी मला उगमत  नाही
माझे  मलाच कळत नाही !!

विषारी  आहे  वियोग  तुझा
क्षणोक्षणाला  मारतो  मला
कितीदा  उभा  राहू  मी
माझे  मलाच  कळत नाही !!


                 ।कवि-डी ।
                स्वलिखीत
                दि. 19.08.2014