ती......

Started by saharshdon, August 21, 2014, 10:01:25 PM

Previous topic - Next topic

saharshdon

समुद्राच्या लाटेसारखे तिचे केस...
गुलाबसारखे ओठ.....
आणि दूर पाण्यातील शिंपल्यांसारखी,
गालावर हलकिशी कलि....

मला कधीच कळून चुकले होते....
तिच्यात काहीतरी वेगळे होते....
सुंदर कोमल स्पर्शाने तिच्या....
अंग अंग रोमांचात होते.....

ती सुंदर होती, निसर्गाची कला होती....
मनमोहक जल परी होती....
रंजक फुलांनी सजलेलं ते झाड होतं...
कधीही न सुकनारं.....

डोळ्यात काजळ....
ते लांब केस....
हळूच डोळ्यावर येनारी ती लट....
आणि हलक्या हाताने ती दूर सारने....

माझया ती जवळ होती....
हृदयाची राणी होती....
जिला मी ती म्हणायचो...
आता ती माझी होती....

तिच्या मोहक हस्याने....
स्वतः ला पण विसरत होतो...
कधी कुठे कसा मी....
तिच्यामध्ये जाम फसलो होतो...

अगदी स्वप्नवत दुनिया होती....
वेळ,काळ अगदी योग्य होता...
परींच्या राज्यात
अगदी वसंत ऋतू होता....

पण ऋतूंचा बदल,
मला कळलच नाही...
एकतर्फी प्रेमात...
मी तिचा विचारच केला नाही...

आज मादाक्तेच्या सौंदर्यात...
अस्पष्ट अश्रू होते.....
धो धो पावसाताही....
माळ रानावरचे झाड करपत होते....

तरीसुधा अंतर्मन,
हृदयाचे सान्त्व न करत होते....
आतल्या आत रडूनही,
शेवटी म्हणत होते....

तू तुझीच आहेस,
निर्णय ही तुझच आहे...
पण माझया हृदयाचे दरवाजे,
तुझया साठी नेहमी खुलेच आहेत...
              नेहमी खुलेच आहेत..... :) :)

Anand D


Payal J


Payal J


saharshdon