कधी तरी शेती करून पहा

Started by nakode.sachin8, August 24, 2014, 10:11:44 AM

Previous topic - Next topic

nakode.sachin8

नांगराला बैलं जुंपुन पहा
आपली पीकं
बहरणारी शेती
मनात साठवून पहा,

पीकं पाहून होणारा आनंद
आन् मातीचा मोहक सुगंध
मनात साठवून पहा


फुलणारा कष्टाचा मळा
अन् कोकीळेचा सुरेल गळा
अशातच न्याहारीचा
आनंद घेऊन पहा

केलेल्या कष्टाचे न िमळणारे चीज
नेहमीच अपूरी िमळणारी वीज
यांचा धाक बाळगून पहा

शेतकरी कष्ट करतो
अन् दुिनयेचं पोट भरतो
पण
देव नेहमी त्याला दु:खच का बरं देतो

त्याच्या दु:खाला आधार देऊन पहा
कधी तरी शेती करून पहा.

-सिचन नाकोडे
चांदवड. िज. नािशक
7588012871