हा रस्ता कुणीकडे.....?

Started by saharshdon, August 24, 2014, 09:10:00 PM

Previous topic - Next topic

saharshdon

                             हा रस्ता कुणीकडे.....?

हे करू का ते करू,
भावनांचे हे कडे...
पुढे जाउनी प्रश्न विचारतो,
हा रस्ता कुणीकडे...?

जाण्या येण्यात शंभर कमी,
मनात एकदा विचार अडे...
भ्रांत पडली आज उद्याची,
पण हा रस्ता कुणीकडे...?

मिठीत प्रेयसी असताना,
लक्ष मात्र तिच्याकडे...
तू सुंदर दिसतेस् म्हणताना,
हा रस्ता मात्र कुणीकडे...?

घरा समोरून जाताना,
सुंदर मुलगी दृष्टीस पडे,
सर्व रस्ते माहीत असूनही,
हा रस्ता हो कुणीकडे....?

पुणेकरांच्या संगतीला,
वाहनांचे तर नेहमीच नडे,
अन् मीटर पाहुणी मनात येते,
हा रस्ता कुणीकडे...?

विद्यार्थी अन् अटेंडेन्स चे,
न उलगडणारे कोडे,
बळजबरीने क्लास भरवताना,
क्लास चा रस्ता हो कुणीकडे....?